Vrangers Blog

Subscribe to feed Viewing entries tagged VRangers Celebrations

VRangers B'day Celebration 2013...अविस्मरणीय

Posted by Administrator
Administrator
Adventure, fun, love for nature and fuelling the hopeless addiction of exploring
User is currently offline
on Monday, 18 February 2013
in Celebrations

अविस्मरणीय आठवणी ...

Vrangers चा B'day event .. Lavali base camp.. खूप उत्सुक  होतो ..
खर म्हणजे मी खूप खुश होतो ते योगायोगामुळे ... माझा वाढदिवस आणि Vrangers चा वाढदिवस एकाच दिवशी !!!
सर्व Rangers कल्याण  स्टेशन ला भेटले .. काही जुने काही नवीन .. सर्वांना पाहून बर वाटल.
आणि आमचा परिवार जीप च्या दिशेने निघाला ..
९ तारखेच्या रात्री १०:३० च्या सुमारास आमच्या जीप्स नाशिक च्या दिशने निघाल्या...
प्रवासात सगळ्यांच्या गप्पा टप्पा चालू होत्या .. माझ्या शेजारी Lavali base camp चा मस्त organizer दीपक होता..
दीपक ने रूट बद्दल आणि क्याम्पिंग बद्दल खूप माहिती सांगितली...
आम्ही कसारा जवळ आमच्या जिगरबाज Bike-Rider कमलेश ला pick केलं .
कसारा सोडल आणि वाढणाऱ्या थंडी बरोबर वेळ हि उडू लागला ...
फोन मध्ये १२ वाजले आणि आनंदा ने गाडीत च announce केल ..
"अपने साथ १ बंदा हे , जिसका आज b'day हे .. मयुर happy b'day"
मग सगळ्यांनी गाडीतच गाण गाउन अभिनंदन केल..
घाटणदेवी च्या मंदिरा जवळ आम्ही dinner साठी थांबलो ...
वेज /नॉन वेज dinner झाल्यानंतर सुधीर ने सर्वात मोठ surprise दिलं.
माझ्या साठी cake आणला होता ...
सर्व Rangers बरोबर cake-cutting celebrate झाल..
अडीच - तीन च्या सुमारास आम्ही Lavali base camp.. ला पोचलो ..
आणि एवढी सुंदर arrangement पाहून खूप बर वाटलं .. tent,campfire आणि आनंदा स्पेशल सूप !!!
कुणाल , कमलेश , अमोघ या संगीत दिग्गजांनी रात्र गाजवली ... आणि संदेश चा रंदेश तयार झाला..
अगदी पाहटे सगळ्यांनी जरा उबदार tents मध्ये पाठ टेकली. मी व कुणाल फेरी साठी निघालो..
पहाटे च रम्य वातावरण , उगवता सुर्य , विरणारी थंडी , तोंडातल्या वाफा आणि लुनाल ने दाखवलेले सुंदर पक्षी.. सगळ कस सुंदर च !!!!
परतलो तेंव्हा सगळे तयार होते .. आनंदा आणि सुधीर ने एक आगळा वेगळा introduction round cum game घेतला ...
नंतर २ तास जे वेगवेगळे team building games खेळण्यात मज्जा आली.. एकदम फुल २ धम्माल !!
शेवट चा game front रोल  मारण्या चा होता .. आणि माझी गम्मत म्हणून on d spot मला खोटं अंतर सांगून double रोल्स मारायला लावले !!!
मग सगळे Rangers पाण्यात उतरले .. त्या तलावाच्या थंड पाण्यात सगळे मनसोक्त डूंबले.
पाण्यात खेळल्या मुले खूप भूक लागली  होती..
मस्त पैकी नॉनवेज जेवणावर ताव मारला... जेवताना सुधीर , कुणाल यांची मस्करी चालूच होती..
जेऊन झाल्यावर , सर्व Rangers मधला अर्जुन बाहेर आला..
धनुष्य - बाणा ची activity खूप रंगली.
मग आम्ही सगळे  Lavali base camp च्या कार्यकर्त्याना भेटलो व निरोप घेतला...
एवढी सुंदर जागा , एवढी छान arrangement , पाय निघत नव्हता..
सगळा डोळ्यात साठवून जीप मधून निघालो.. कल्पेश बरोबर डुलक्या काढत काढत घोटी पर्यंत पोचलो..
घोटी ला feedback round झाला , सर्वांचा निरोप घेऊन मी कमलेश बरोबर bike ने पुढे निघालो..
घोटी ते नाहूर जवळ पास दीडशे किलोमीटर .... सुसाट वेगात .... !!
"आयुष्या त जेवढे वाढदिवस साजरे केले त्यातील सर्वात सुंदर दिवस हा होता !! ".
धन्यवाद - VRangers ,  Lavali base camp organizers आणि सर्व Participants !!

 

Newsletter